
नांदेड, 8 डिसेंबर (हिं.स.)नांदेड मधील विविध क्षेत्रात प्रथित यश संपादन करणारांचा भारतीय जनता पार्टीच्या वतिने सत्कार करण्यात आला. नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिका, जेष्ठ कवियत्री डाॅ वृषाली किन्हाळकर यांना कै.शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला तसेच जेष्ठ शास्त्रीय गायक यांना महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक मंत्रालयाचा वतिने देण्यात जेष्ठ गायक पुरस्कार श्री धनंजय जोशी यांना प्राप्त झाला आणी नांदेड मधिल पत्रकार क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट लिखान करणारे प्रजावाणी चे संपादक श्री.शंतनु डोईफोडे यांना जेष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जाहीर झाला आसुन कोकणातील त्याचा गावी सहा जानेवारीला पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सत्कार आज भारतीय जनता पार्टी चा वतिने करण्यात आला
यावेळी नांदेड महानगर अध्यक्ष अमर राजुरकर,अध्यक्ष प्रवीण साले,सरचिटणीस विजय येवनकर,विजय गंभीरे, मिलिंद देशमुख,मंडल अध्यक्ष आशिष नेरलकर,,बालाजी बोकारे, यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis