अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवाशांचे पूर्ण पैसे परत करा- मुरलीधर मोहोळ
पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.)।विमान उड्डाणांच्या नियोजनातील गोंधळाचा फटका बसलेल्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांच्या तिकिटाचे पैसे तातडीने परत करा, असे स्पष्ट निर्देश ‘इंडिगो’ कंपनीला देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय न
Air Plane


पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.)।विमान उड्डाणांच्या नियोजनातील गोंधळाचा फटका बसलेल्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांच्या तिकिटाचे पैसे तातडीने परत करा, असे स्पष्ट निर्देश ‘इंडिगो’ कंपनीला देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ‘या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती नेमण्यात आली असून, त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई निश्चितपणे केली जाईल. चौकशी अहवालानुसार ज्याची चूक असेल, त्याच्यावर कठोर कारवाई होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

‘इंडिगो’ या विमान कंपनीच्या नियोजनातील गोंधळामुळे गैरसोयींचा सामना करावा लागलेल्या प्रवाशांच्या तिकिटाचा परतावा आणि साहित्य परत करण्याबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी पत्रकारांना दिली. विमान कंपन्यांच्या मनमानी कारभारावर केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी कठोर भूमिका घेतली आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयामार्फत तिकीट दरांवर मर्यादेसह प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.

--------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande