
पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.)।नवले पुलावर अपघाताची मालिका सुरुच आहे. याठिकाणी आज पुन्हा एकदा अपघात घडला आहे. यावेळी स्कूल बसने कारने धडक दिली आहे. नवले पुलावरील ब्लॅक स्पॉटवर हा अपघात घडला असून या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे वाहतूक कोंडीही बघायला मिळली आहे.
पुण्यातील नवले पुलावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. गेल्या महिन्यात १३ नोव्हेंबर रोजी नवले पुलावर भीषण अपघात घडला होता. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर चार दिवसांनी नवले पुल परिसरात आणखी एक अपघाताची घटना घडली होती. यावेळी भुमकर पुलावर चार ते पाच गाड्या एकमेकांना भिडल्या होत्या. यात ३ गाड्याचं नुकासान झालं होतं.
अशातच आज पहाटे पु्न्हा एकदा नवले पुरावर अपघाताची घटना घडली आहे. यावेळी एका स्कूलबसने कारला धडक दिल्याची माहिती आहे. यात कारचा मागचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. तर स्कूलबसच्या बोनेटचं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही. मात्र, यात दोघे जण जखमी झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु