पुणे : अभय योजनेचा सव्वाशे कोटींचा दिलासा
पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.)। मिळकतकर वसुलीसाठी महापालिकेने राबवलेल्या अभय योजनेच्या पहिल्या १५ दिवसात पालिकेच्या तिजोरीत तब्बल १२५ कोटी रूपये जमा झाले आहेत. ४ लाख ५० हजार थकबाकीदारांमधील २४ हजार मिळकत धारकांनी हा कर जमा केला आहे. त्यामुळे पालिकेचे मिळ
PMC news


पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.)। मिळकतकर वसुलीसाठी महापालिकेने राबवलेल्या अभय योजनेच्या पहिल्या १५ दिवसात पालिकेच्या तिजोरीत तब्बल १२५ कोटी रूपये जमा झाले आहेत. ४ लाख ५० हजार थकबाकीदारांमधील २४ हजार मिळकत धारकांनी हा कर जमा केला आहे. त्यामुळे पालिकेचे मिळकतकर उत्पन्न सुमारे १९०३ कोटी झाले आहे.

योजनेच्या सुरूवाती प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने त्यात बदल केला. पालिकेची मिळकतकराची थकबाकी १३ हजार कोटींच्यावर गेली असून नोटिसा बजावून, मिळकती जप्त करून त्याचा लिलाव करण्याचे कडक धोरण पालिकेने राबविले आहे. त्यानंतरही अनेक थकबाकीधारक कर भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे अभय योजना जाहीर केली. त्यानुसार १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारीमध्ये थकबाकी भरणाऱ्या मिळकतधारकांना थकबाकीवरील दंडाच्या रकमेवर ७५ टक्के सवलत आहे.या योजनेतून पालिकेने २०१६ नंतर राबविलेल्या अभय योजनेच्या लाभार्थींना वगळले होते. मात्र, राजकीय दबाव आणि निवडणूकांच्या तोंडावर वाद नको म्हणून प्रशासनाने नंतर ही योजना सरसकट राबविली. त्यातून मागील पंधरा दिवसात १२५ कोटींचा महसूल मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande