
सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)।सोलापूर मळोली (ता. माळशिरस ) येथे गेली अनेक दिवसापासून अवैद्य दारू विक्री बंद करा. या मागणीसाठी मळोली ग्रामपंचायत व गावातील तरुण युवक पाठपुरावा करीत आहेत. मात्र दारू विक्री बंद न होता ती आणखी जोमात विकली जाऊ लागली असल्याचे चित्र सद्य स्थितीत दिसून येत आहे. त्यामुळे अवैध दारु विक्री जोमात आणि पिणारे मात्र कोमात अशी परिस्थती निर्माण झाली आहे.
मळोली ग्रामपंचायत अंतर्गत अनेक वेळा ग्रामसभेत ठराव केलेले पत्र वेळापूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे. त्याबद्दल तात्पुरती कार्यवाही करून पुन्हा दारू विक्रेते यांना मोकाट सोडण्याचे प्रकार पोलीस ठाण्याच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी दारू विक्री केली जात आहे. त्याच्या बाजूनी जिल्हा परिषद शाळा व नागरिकांची लोकवस्ती आहे. यातून अनेक वेळा वादाचे प्रसंग घडलेले आहेत. याच मार्गाने हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना पुढे शाळेसाठी जावे लागते. पोलीस व उत्पादन शुल्क विभाग यांनी सतत कार्यवाहीचा बडगा चालू केला, तर ही दारू विक्री कायमस्वरूपी बंद होऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड