पुण्यात काँग्रेसची मोर्चेबांधणी; ९ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज वाटप सुरू
पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून, त्याची सुरुवात इच्छुकांच्या अर्जांनी केली आहे. कॉंग्रेसनेही महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या
पुण्यात काँग्रेसची मोर्चेबांधणी; ९ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज वाटप सुरू


पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून, त्याची सुरुवात इच्छुकांच्या अर्जांनी केली आहे. कॉंग्रेसनेही महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांकडून अर्ज मागवले आहेत. पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ९ ते १३ डिसेंबरपर्यंत अर्ज मिळणार आहेत. मात्र, अर्ज १३ डिसेंबरलाच सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली. काँग्रेसने या आधीच पक्षपातळीवर बऱ्याच बैठका घेतल्या आहेत. विविध सेलच्याही विभागनिहाय बैठका झाल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक स्तरावरची त्यांनी उमेदवारांची चाचपणी केली आहे. आरक्षण जाहीर झाल्यामुळे उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरपालिका, पंचायत समितीप्रमाणे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये समन्वयाने लढणार की वेगळे याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही. मात्र, स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे निरोप त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. इच्छुकांनीही मोर्चेबांधणी केली असून, नाराजीनाट्य, पक्षांतर आदी गोष्टींचे आव्हान पक्षासमोर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande