सोलापूर मार्गावर उच्च विद्यूत दाब क्षमता असलेले ‘स्काॅट ट्रान्सफाॅर्मर’ कार्यान्वित
सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)मध्य रेल्वे विभागात प्रथमच सोलापूर मार्गावर उच्च विद्यूत दाब क्षमता असलेले ‘स्काॅट ट्रान्सफाॅर्मर’ कार्यान्वित करण्यात आले असून चार ठिकाणी असेच व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या
सोलापूर मार्गावर उच्च विद्यूत दाब क्षमता असलेले ‘स्काॅट ट्रान्सफाॅर्मर’ कार्यान्वित


सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)मध्य रेल्वे विभागात प्रथमच सोलापूर मार्गावर उच्च विद्यूत दाब क्षमता असलेले ‘स्काॅट ट्रान्सफाॅर्मर’ कार्यान्वित करण्यात आले असून चार ठिकाणी असेच व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच मालवाहून नेहणाऱ्या गाड्यांची क्षमता आणि गती लवकरच मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. प्रामुख्याने सोलापूर-पुणे-मुंबई मार्गावरील ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या प्रवासी कालावधीत लवकरच घट होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मध्ये रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागाच्या लोहमार्गावर दौंड, गौंडगाव आणि सोलापूर या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना अपेक्षित उच्च दाबाचा विद्यूत पुरवठा होत नसल्याने वेगमर्यादेत स्थित्यंतरे येत होती. वेगवान प्रवासी गाड्या तसेच मालवाहून नेहणाऱ्या गाड्यांचा वेग ठराविक ठिकाणी कमी करावा लागत होता. त्यामुळे अपेक्षित ठिकाणी पोहचण्यासाठीच्या वेळापत्रकानुसार हा टप्पा पार केल्यानंतर पुढील स्थानकावर पोहचण्यासाठी कसरत आतापर्यंत सुरू होती. तसेच अनेक अनावधानाने वेगात गाडी धावल्यास वीजपुरवठा कमी-जास्त होऊन खंडीत होण्यासारख्या तांत्रिक समस्या, उच्च दाब पुरवठा खंडीत होण्याच्या घटना आणि इतर तांत्रिक समस्या वारंवार उद्भवत असून कमी कालावधीत अंतर गाठणाऱ्या सोलापूर-पुणे-मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसचा वेग मंद करावा लागत होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande