महामेट्रोच्या व्यवस्थापनाने कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा - आकाश फुंडकर
मुंबई, 18 फेब्रुवारी (हिं.स.)। महामेट्रोच्या व्यवस्थापनाने मान्य केल्याप्रमाणे नागपूर येथील महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांच्या केद्र सरकारने निर्धारित केल्याप्रमाणे किमान वेतन देऊन कामगारांना न्याय द्यावा, अशा सूचना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी
Akash


मुंबई, 18 फेब्रुवारी (हिं.स.)। महामेट्रोच्या व्यवस्थापनाने मान्य केल्याप्रमाणे नागपूर येथील महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांच्या केद्र सरकारने निर्धारित केल्याप्रमाणे किमान वेतन देऊन कामगारांना न्याय द्यावा, अशा सूचना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केल्या.

महा मेट्रोअंतर्गत नागपूर मेट्रो रेल, नागपूर येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कामगार मंत्री श्री.फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस आमदार प्रविण दटके, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, महामेट्रोचे महाप्रबंधक सुधाकर उराडे, कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कामगार संघटना तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

महामेट्रो मधील कंत्राटी कामगारांची केंद्रीय कामगार प्राधिकरणाकडे तसेच राज्य शासनाच्या कामगार विभागाकडे नोंदणी झालेली आहे. तथापि, महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांचा वेतन प्रश्न हा न्यायालयीन असल्याने महामेट्रोच्या सर्व कंत्राटी कामगारांना शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे किमान वेतनानुसार वेतन देण्यासंदर्भात मेट्रो व्यवस्थापनाने कार्यवाही करण्याची सूचना कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी केली.

राज्यातील मेट्रो सेवेतील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनासंदर्भात मंत्री श्री.फुंडकर म्हणाले की, राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याचबरोबर एमएमआरडीए, एमआरसीएल, पीएमआरडीए या मेट्रोमध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये एकसुत्रता असावी, यासाठी त्यांना एका प्रवाहाखाली आणले जाईल. महामेट्रो कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला जावा, यासाठी लवकरच एक बैठक घेण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande