पुणे, 4 फेब्रुवारी (हिं.स.)।बनावट कागदपत्रांचा वापर, तसेच बनावट जामीनदार न्यायालायत हजर करुन सराइतांना जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी अटक केली. बनावट जामीनदारांच्या टोळीला मदत करणाऱ्या दोन वकिलांसह अकरा जणांना अटक करण्यातल्ली असल्याची माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बनावट जामीनदार प्रकरणात काही महत्वाचे धागेदोरे मिळाल्यानंतर रविवारी रात्री उशीरा ॲड. अस्लम गफूर सय्यद (वय ४५, रा. वैदुवाडी, हडपसर) आणि ॲड. सुरेश जाधव (वय ४३, रा. हडपसर) यांना अटक करण्यात आली. यापूर्वी न्यायालयात बनावट जामीनादार म्हणून उपस्थित राहिलेले आरोपी संतोषकुमार तेलंग, संजय पडवळ, सुभाष कोद्रे, ज्ञानेश्वर शिंदे, सुजीत सपकाळ, भूपाल कांगणे, जितेंद्र यांना अटक करण्यात आली होती. गु्न्ह्यात अटक केल्याननंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात येते. येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना जामीनदार उपलब्ध होत नसल्याने आरोपींनी वकिलांशी संगमनत करुन बनावट जामीनदार न्यायालयात सादर केले. शैक्षणिक विभागांनी घेतलेल्या सत्र परीक्षेच्या निकालाची रखडपट्टीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक विभागांनी घेतलेल्या सत्र परीक्षेच्या निकालाची रखडपट्टी झाली आहे. अंतर्गत आणि बाह्य मूल्यमापनाच्या मूल्यांकन पद्धतीच्या अनिश्चिततेचा फटका निकालांना बसला असून, आता नव्या परिपत्रकामुळे निकाल तयार केलेल्या विभागांवर पुन्हा नव्याने निकाल तयार करण्याची वेळ आली आहे.विद्यापीठातील विभागांमध्ये आतापर्यंत ५० टक्के गुण अंतर्गत मूल्यमापन आणि ५० टक्के गुण बाह्य मूल्यमापनाला अशी ५०ः५० मूल्यांकन पद्धती लागू होती. गेल्यावर्षी ही पद्धती बदलून ७०:३० मूल्यांकन पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. या वर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर पुन्हा ७०:३० मूल्यांकन पद्धत लागू करण्याबाबतची सूचना देण्यात आली. त्याला विद्यापीठातील शैक्षणिक विभागांनी विरोध केला होता. त्यानंतर विद्यापीठातील विभागांमध्ये हिवाळी परीक्षा झाल्या. मूल्यांकन पद्धती निश्चित नसल्याने निकाल प्रलंबित राहिले आहेत. २४ जानेवारीच्या परिपत्रकाद्वारे विद्यापीठातील विभागांना ५०:५० मूल्यांकन पद्धत लागू करण्यास मान्यता देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, काही विभागांनी पूर्वीच्या आदेशानुसार ७०:३० मूल्यांकन पद्धतीनुसार निकाल तयार करण्याची प्रक्रिया राबवली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु