सोलापुरातील 800 जेष्ठ नागरिक श्री जगन्नाथ मंदिर, पुरी  येथे जाणार
सोलापूर, 5 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक श्री जगन्नाथ पुरी ओरिसा येथे दर्शनासाठी दि
सोलापुरातील 800 जेष्ठ नागरिक श्री जगन्नाथ मंदिर, पुरी  येथे जाणार


सोलापूर, 5 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक श्री जगन्नाथ पुरी ओरिसा येथे दर्शनासाठी दि. ११ ते १६ फेब्रुवारी २०२५ रोजी जाणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी दिली.

देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर र्धार्मयांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे पुण्य कर्म म्हणून आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. सदर बाव विचारात घेवून सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सुरू करण्यात आली आहे.

दिनांक 03 ऑक्टोबर 2024 रोजी पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये श्री. जगन्नाथ मंदिर, पुरी ओरिसा या ठिकाणासाठी तीर्थदर्शनाकरिता पात्र 800 लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानुसार सोलापूर ते श्री जगन्नाथ मंदिर, पुरी ओरिसा या ठिकाणी दि. 07 ते दि.12 फेब्रुवारी 2025 ऐवजी आता दिनांक 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2025 रोजी या कालावधीत तीर्थदर्शनास जाणेकरिता सुधारित मान्यता दिलेली आहे.

सदरील नियोजित तीर्थदर्शनाच्या यात्रेदरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडीकल स्टाफ (नर्स) तसेच सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सोबत असणार असून तीर्थदर्शनास जाणेकरिता रेल्वे आरक्षित करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी दिलीं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande