नितीन गडकरी, देवेंद्र
फडणवीसांच्या उपस्थितीत उद्घाटन
नागपूर, 05 फेब्रुवारी (हिं.स.) : विदर्भाच्या मेगा
इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस कॉन्क्लेव्ह
आणि इन्व्हेस्टमेंट समिट ‘ऍडव्हान्टेज विदर्भ 2025 - खासदार औद्योगिक महोत्सव’ चे शुक्रवारी 7 फेब्रुवारी सकाळी 10.30 वाजता
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
असोसिएशन फॉर
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) द्वारे आयोजित अॅडव्हांटेज विदर्भ 2025 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
परिसर, अंबाझरी मार्ग,
नागपूर येथे 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सत्राला महसूल मंत्री आणि नागपूरचे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,उद्योग मंत्री उदय सामंत, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांची
विशेष उपस्थिती राहणार आहे. सोबतच, सज्जन जिंदाल, बालसुब्रह्मण्यम प्रभाकरन, रोशनी नादर मल्होत्रा आणि जीबीएस राजू, अतुल गोयल सारखे प्रसिद्ध उद्योगपती तसेच,
अॅड. आशिष शेलार, अतुल सावे, संजय राठोड, डॉ. अशोक उईके, संजय सावकारे, आशिष जयस्वाल, पंकज भोयर आणि इंद्रनील नाईक हे नेते उपस्थित
राहतील.
या औद्योगिक
प्रदर्शनात विविध उत्पादने आणि बहु-क्षेत्रीय उद्योगांचे 300 हून अधिक स्टॉल
राहणार आहेत. त्यापैकी 100 स्टॉल सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात
आले आहेत. इतर स्टॉलमध्ये संरक्षण सार्वजनिक उपक्रम, स्टील आणि खाण मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सेबी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, जीएसटी विभाग, पोस्ट विभाग, सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम), शैक्षणिक संस्था यासारख्या सरकारी विभागांमधील
विविध क्षेत्रातील उत्पादन श्रेणी, यंत्रसामग्री आणि सेवा प्रदर्शित केल्या जातील. या कार्यक्रमात स्टील,
संरक्षण, विमान वाहतूक, बांबू, दुग्धव्यवसाय, शिक्षण, आयटी आणि आयटीईएस,
लॉजिस्टिक्स, स्टार्टअप्स, फार्मास्युटिकल्स, अक्षय ऊर्जा, पर्यटन, वस्त्रोद्योग, रत्ने आणि दागिने, स्टार्टअप इकोसिस्टम एंगेजमेंट यासह विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय
चर्चासत्रे आणि तांत्रिक चर्चा आयोजित केल्या जातील. स्टार्टअप क्षेत्रातील
युनिकॉर्न संस्थापक अखिल गुप्ता, संस्थापक, NoBroker.com, विभव कपूर, सह-संस्थापक,
प्रिस्टाईन पॉलिसीबाजारचे अध्यक्ष आणि
सीईओ सर्ववीर सिंग आणि अपना चे निर्मित यांचा सहभाग राहील. तसेच, युनिकॉर्न व्हेंचर्सचे अनिल जोशी, गुगल स्ट्रॅटअपचे अपूर्व चामरिया, हेलिकॉप्टर मॅन प्रदीप शिवाजी मोहिते, एअर व्हाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर, लेफ्टनंट जनरल संजय वर्मा, मेजर जनरल अनिल बाम, एआयसीटीई दिल्लीचे डॉ. अभय जेरे, टीसीएसचे अरविन कुमार, नौकरी डॉट कॉमचे रोहित दमानी हे देखील विविध
सत्रांमध्ये सहभागी होतील.
ऍडव्हान्टेज विदर्भ
मध्ये पहिल्यांदाच पेटंट गॅलरी प्रदर्शित केली जात आहे. यात पर्यावरण/सामाजिक
प्रभाव, कोअर इंडस्ट्री,
केमिकल, हेल्थ टेक्नॉलॉजी, बायोटेक, अॅग्रोटेक, आयओटी/रोबोटिक्स/एआय आणि फिनटेक या श्रेणींतील एकुण 41 पेटंटचा समावेश राहणार आहे. विद्यार्थी
व्यावसायिकीकरण आणि इन्क्युबेशसाठी तयार असलेले हे आपले नवोपक्रम प्रोटोटाईप
येथे प्रदर्शित करतील. यावेळी, आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त डॉली चायवाला यांची उपस्थिती
प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र असेल. याशिवाय विविध फूड कोर्ट, मनोरंजनासाठी गेमिंग आणि ई-गेमिंग झोन, फॅशन शो, बँड स्पर्धा यांनाही एक्स्पोमध्ये स्थान देण्यात आले आहे. भारत
मोबिलिटी येथे लाँच केलेली दुचाकी आणि चारचाकी ई-वाहने देखील प्रदर्शनाचे आकर्षण
असणार आहेत.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni