किशोर शर्मा यांची किसान काँग्रेस कमिटीच्या ठाणे शहर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती
ठाणे, 5 फेब्रुवारी, (हिं.स.)। ठाणे : ठाण्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते किशोर शर्मा यांची महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस कमिटी अध्यक्ष पराग पष्टे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस किसान कमिटीच्या ठाणे शहर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आ
किशोर शर्मा यांची किसान काँग्रेस कमिटीच्या ठाणे शहर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती


ठाणे, 5 फेब्रुवारी, (हिं.स.)। ठाणे : ठाण्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते किशोर शर्मा यांची महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस कमिटी अध्यक्ष पराग पष्टे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस किसान कमिटीच्या ठाणे शहर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मा यांच्या नियुक्तीने ठाणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी एक सजग नेतृत्व लाभल्याच्या भावना ठाणे जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहेत. किशोर शर्मा हे अखिल भारतीय राष्ट्रीय किसान काँग्रेसचे सदस्य आहेत.

ठाणे शहर जिल्हा प्रभारी शमीम आलम यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस किसान कमिटीचे अध्यक्ष पराग पष्टे यांच्या नेतृत्वाखाली किशोर शर्मा यांची ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

किशोर शर्मा हे ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत नेते आहेत. ठाणे जिल्ह्यातील युवा काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये किशोर शर्मा यांचे मोलाचे योगदान आहे. ठाणे जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचे एन एस यु आय या विद्यार्थी संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. तसेच ऑल इंडिया एन एस यू आय चे सह सेक्रेटरी हे पद देखील त्यांनी भूषविले. ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसचेही ते अध्यक्ष होते. तसेच रेल्वेच्या व्हेअर आर यु सी सी चे ते सभासद आहेत व पीसीसी मेंबर देखील आहेत. त्यांच्या रूपाने ठाणे जिल्हा काँग्रेसला नव्याने उभारी मिळणार आहे. ठाणे जिल्हा काँग्रेसमध्ये नव्याने परिवर्तन होईल. शेतकरी कष्टकरी श्रमिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किशोर शर्मा हे नेहमीच अग्रेसर असतात. स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा लाभलेले किशोर शर्मा हे गेली अनेक दशके काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्षातर्फे होणार्‍या अनेक आंदोलनांमध्ये किशोर शर्मा यांनी मार्गदर्शन तसेच सहभाग घेतला होता. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक लोकप्रिय कार्यक्रम यशस्वीपणे राबविले. तरुण कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करत ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसमध्ये तरुणांची मजबूत फळी तयार करण्यात किशोर शर्मा यांचा मोलाचा वाटा आहे. किशोर शर्मा हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वाणिज्य व उद्योग सेलचे उपाध्यक्षही होते. ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शर्मा यांच्या नियुक्तीने शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी ते रस्त्यावरची लढण्यासाठी सज्ज झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande