पाडव्याच्या मुहूर्तावर चैत्र नवरात्र निमित्त पंजाबी राधा-कृष्ण मंदिरात घटस्थापना
अहिल्यानगर दि. 30 मार्च (हिं.स.) :- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील राधा-कृष्ण मंदिरात रविवारी (दि. 30 मार्च) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर चैत्र नवरात्र निमित्त देवीची घटस्थापना उत्साहात करण्यात आली.चैत्र नवरात्रा च्या पार्श्‍वभूमीवर सात दिवस
पाडव्याच्या मुहूर्तावर चैत्र नवरात्र निमित्त पंजाबी राधा-कृष्ण मंदिरात घटस्थापना


अहिल्यानगर दि. 30 मार्च (हिं.स.) :- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील राधा-कृष्ण मंदिरात रविवारी (दि. 30 मार्च) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर चैत्र नवरात्र निमित्त देवीची घटस्थापना उत्साहात करण्यात आली.चैत्र नवरात्रा च्या पार्श्‍वभूमीवर सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता व सर्व विश्‍वस्तांच्या हस्ते घटस्थापना झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शीख, पंजाबी भाविकांनी देवीचा जयघोष केला. या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत किर्तन होणार आहे. तर दररोज संध्याकाळी 7 वाजता आरती होणार आहे. नवरात्रनिमित्त मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.शनिवारी (5 एप्रिल) अष्टमीला या धार्मिक सोहळ्याचा समारोप होणार आहे. रविवारी (6 एप्रिल) रोजी रामनवमी निमित्त दुपारी 12 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आरतीनंतर भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शनिवार 12 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. या धार्मिक सोहळ्यात भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन राधा-कृष्ण मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande