अहिल्यानगर दि. 30 मार्च (हिं.स.) :- महानगरपालिका हद्दीतील डॉ.ना. ज. पाऊलबुद्धे शाळा ते मुळे एस.टी.डी पर्यंत मुख्य रस्त्याचे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे मार्ग व निर्मलनगर परिसरातील भगवानबाबा अपार्टमेंट ते रोहन रेसिन्डेन्सी या अंतर्गत रस्त्याचे स्व. रुख्मीणीबाई काळे आज्जी मार्ग नामकरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी आमदार शिवाजी कर्डीले, आमदार संग्राम जगताप, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते.स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तृत्वाला साजेसे असे त्यांचे भव्य स्मारक अहिल्यानगर शहरात उभारण्यात येईल, असे पालकमंत्री विखे पाटील म्हणाले. जिल्ह्यात अनेक बीडी कामगार महिला आहेत. या महिलांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच निर्मलनगर भागाला पूर्ण दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल, असेही ते म्हणाले.आमदार संग्राम जगताप यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni