पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा 'अबीर-गुलाल' चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मनसेची मागणी
मुंबई, 2 एप्रिल (हिं.स.)। पाकिस्तानी अभिनेता फवाद खान 'अबीर गुलाल' या चित्रपटातून ८ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटाचा टीझर १ एप्रिल रोजी प्रदर्शित झाल्यानंतर फवाद खानचे चाहते आनंदात होते, तर त्यावरून वादही सुरू झाला आहे.राज ठा
Favad khan movie


मुंबई, 2 एप्रिल (हिं.स.)। पाकिस्तानी अभिनेता फवाद खान 'अबीर गुलाल' या चित्रपटातून ८ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटाचा टीझर १ एप्रिल रोजी प्रदर्शित झाल्यानंतर फवाद खानचे चाहते आनंदात होते, तर त्यावरून वादही सुरू झाला आहे.राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच महाराष्ट्रात या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

मनसे सिनेमा शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ते महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाहीत कारण त्यात एक पाकिस्तानी कलाकार काम करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबद्दल माहिती मिळाली. मनसेने म्हटले आहे की, हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होणार नाही. याप्रकरणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी द्यायची की नाही हा निर्णय सरकारने घेतला पाहिजे.

या चित्रपटाच्या टीझरमध्ये फवाद खान गाडी चालवत असताना एक जुने गाणे गुणगुणताना दिसत आहे, ज्याचा आनंद वाणी कपूर घेत आहे. टीझरमध्ये दोघांमधील केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. 'अबीर गुलाल' हा चित्रपट ९ मे २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये फवाद खान आणि वाणी कपूर व्यतिरिक्त रिद्धी डोगरा, लिसा हेडन, फरीदा जलाल आणि सोनी राजदान सारखे कलाकार दिसतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande