नाशिक बाजार समिती पहाटे ४ पर्यंत बंद
नाशिक, 2 एप्रिल (हिं.स.) नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत रात्री अकरा वाजेनंतर होणाऱ्या चोऱ्या माऱ्या व गुंड टोळक्यांकडून शेतकरी तसेच व्यापाऱ्यांचे पैसे हिसकावून घेणे, शेतकऱ्यांच्या मालाची चोरीच्या घटना लक्षात घेता शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दररोज र
नाशिक बाजार समिती पहाटे ४ पर्यंत बंद


नाशिक, 2 एप्रिल (हिं.स.) नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत रात्री अकरा वाजेनंतर होणाऱ्या चोऱ्या माऱ्या व गुंड टोळक्यांकडून शेतकरी तसेच व्यापाऱ्यांचे पैसे हिसकावून घेणे, शेतकऱ्यांच्या मालाची चोरीच्या घटना लक्षात घेता शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दररोज रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत बाजारसमिती बंद करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.नाशिक बाजार समितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणतात. मात्र रात्रीच्या सुमारास बाजारसमितीच्या भाजीपाला बाजारात कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्केटयार्डवर कायदा व सुरक्षा व्यवस्था अबाधित राहील व बाजार घटकांना भितीमुक्त व्यवहार करता यावे यासाठी बाजारसमिती संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. तसे फलक लावण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande