मुंबई, 3 एप्रिल (हिं.स.)।
मध्य रेल्वेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३२५.९३ किमी लांबीचे ट्रॅक सुरू करून पायाभूत सुविधांच्या विकासाप्रती आपली वचनबद्धता दर्शविली आहे. यामध्ये आयुक्त रेल्वे सुरक्षा यांनी दिलेल्या २५८.४४ किलोमीटर ट्रॅकची सुरक्षा मंजुरी आणि ६७.४९ किलोमीटर ट्रॅकची इंजिन ट्रायल रन पूर्ण करणे हे समाविष्ट आहे.
या आर्थिक वर्षात दोन प्रमुख वाहतूक सुविधेची कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत ...
२४ कोच गाड्या सामावून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १०/११ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १२/१३ चा विस्तार आणि यार्ड रीमॉडेलिंगच्या कामासह इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची तरतूद.
कसारा यार्ड येथे अप आणि डाऊन मार्गिकेमध्ये प्रत्येकी ३ रिसीव्ह आणि डिस्पॅच लाईन्सचा विस्तार आणि कसारा येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ चा विस्तार आणि रुंदीकरण.
याव्यतिरिक्त, विविध नॉन-इंटरलॉकिंग कामांमध्ये हे समाविष्ट आहे ...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, खंडवा, सिंदी, पुणतांबा, पाचोरा, भांदक, सेलू रोड, हिंगणघाट आणि चिकनी रोड या १०० हून अधिक मार्ग (रूट्स) असलेल्या ९ प्रमुख यार्डमधील यार्ड रीमॉडेलिंग.
कसारा, चाळीसगाव आणि गोधनी या ३ प्रमुख यार्डमध्ये बदल
रेल्वे बोर्डाकडे एकूण १९ सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आले आहेत, त्यापैकी ६ मंजूर झाले आहेत आणि १३ अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, “प्लॅन हेड” (पीएच) ३० अंतर्गत ३ रोड ओव्हर ब्रिज आणि ३ रोड अंडर ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या १००% साध्य केले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीतून प्रवाशांना कार्यक्षमतेने सेवा देण्याची, सुरक्षितता सुनिश्चित करण्याची आणि अधिक शाश्वत आणि सुरक्षित रेल्वे नेटवर्कसाठी तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याची अतूट वचनबद्धता दिसून येते.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने