नाशिक, 3 एप्रिल (हिं.स.)। जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु विभागाला अचानक आग लागल्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये मोठी धावपळ उडाली होती पण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या दक्षतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही असे अग्निशमन विभागाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये असलेल्या यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळा साठी तयार करण्यात आलेल्या नवजात शिशु विभाग हा सुरू करण्यात आलेला आहे या ठिकाणी आज शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली यानंतर तातडीने अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली दरम्यानच्या काळात या ठिकाणी असलेल्या नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी सर्व नवजात बालकांना इतर ठिकाणी हलविल्यामुळे जीवित हानी झाली नाही . मधल्या काळामध्ये अग्निशमन विभाग या ठिकाणी दाखल झाला आणि आग आटोक्यात आणली यामुळे काही काळ जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर ती धावपळ सुरू झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI