रत्नागिरी : मोटार आणि एसटीच्या अपघातात एकाचा मृत्यू
रत्नागिरी, 3 एप्रिल, (हिं. स.) : शहराजवळच्या कारवांचीवाडी परिसरात एसटी बस आणि मोटार यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, एकजण किरकोळ जखमी झाला. हा अपघात आज (गुरुवारी) घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वस्ती फायनान्स कंपनीची मोटार घ
रत्नागिरी : मोटार आणि एसटीच्या अपघातात एकाचा मृत्यू


रत्नागिरी, 3 एप्रिल, (हिं. स.) : शहराजवळच्या कारवांचीवाडी परिसरात एसटी बस आणि मोटार यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, एकजण किरकोळ जखमी झाला. हा अपघात आज (गुरुवारी) घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वस्ती फायनान्स कंपनीची मोटार घेऊन ५ कर्मचारी चेंबूरहून रत्नागिरीकडे निघाले होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटार कारवांचीवाडी फाटा येथे आली असता रामोरून येणाऱ्या एसटी बसला मोटारीची जोरदार धडक बसली. त्यामुळे विकास नवसरे (वय ३४, रा. मुंबई) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालय दाखल केले गेले. मात्र, त्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. नवसरे चालकाच्या मागच्या आसनावर बसले होते. ते स्वस्ती फायनान्सचे युनिट मॅनेजर होते. मध्यरात्री १२ वाजता ते सर्व मुंबईतून रत्नागिरीत यायला निघाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. कारवांची वाडी फाट्यावर असलेले वळण चालकाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे समोरासमोर मोटारीची एसटी बसला समोरून धडक बसली. त्यात एकाचा मृत्यू झाला.

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande