रत्नागिरी, 3 एप्रिल, (हिं. स.) : येथील दैवज्ञ हितवर्धक नागरी सहकारी पतसंस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ३५ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत व्यवहाराशी संबंधित सर्वच बाबींमध्ये उच्चांकी वाढ झाल्याचे पतसंस्थेचे चेअरमन विजय विनायक पेडणेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.
पतपेढीचे उपाध्यक्ष दिपक गोविंद खेडेकर, सचिव सौ. रत्ना सदानंद आचरेकर सर्व संचालक मंडळ, सर्व कर्मचाऱ्यांचे काटेकोर नियोजन आणि अथक परिश्रमामुळे पतसंस्थेचा प्रगतीचा आलेख वाढत असल्याचे पतसंस्थेच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले.
या आर्थिक वर्षापर्यंत पतसंस्थेचे १४ हजार ६०० सभासद झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये वाढ झाली असून एकूण ठेवी ४.९३ कोटी झाल्या आहेत. कर्ज वितरणामध्येदेखील वाढ झाली असून आर्थिक वर्षात ५.६७ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा पतसंस्थेमार्फत करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी