पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त आयुक्त मृत्यूमुखी
श्रीनगर, 10 मे (हिं.स.) : जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे पाकिस्तानी गोळीबारात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थप्पा यांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट करू
राजकुमार थापा


श्रीनगर,

10 मे (हिं.स.) : जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी

येथे पाकिस्तानी गोळीबारात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थप्पा यांचा

मृत्यू झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट

करून या घटनेची माहिती दिली.राजकुमार

थापा हे राजौरीतील सरकारी निवासस्‍थानी वास्तव्यास होते. गोळीबारात राजौरीचे

अतिरिक्त उपायुक्त राजकुमार थापा आणि त्यांचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले.

त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्‍यात आले. मात्र येथे त्‍यांचा

मृत्यू झाला. इतर दोन्‍ही कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे.

मुख्यमंत्री ओमर

अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटर संदेशात सांगितले की, राजौरीहून वेदनादायी बातमी आली आहे. आपण

जम्मू-काश्मीर प्रशासकीय सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला आहे. कालच ते

उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्याचा दौरा करत होते. मी अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन

बैठकीला उपस्थित होते. आज पाकिस्तानने राजौरी शहराला लक्ष्य करून केलेल्या

गोळीबारात आमचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांना प्राण गमवावे

लागले आहे. या भयानक जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

त्याच्या आत्म्याला शांती लाभो असे अब्दुल्ला यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande