
धुळे, 10 मे (हिं.स.) शिवारातील इच्छापूर्ती गणपती मंदिरासमोरील शेतातल्या पत्र्याच्या छताखाली छापा घालून पोलीसांनी जुगाचा अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत जुगारी साधने, मोबाईल व वाहने असा एकूण तीन लाख ४६ हजार ६०० रूपये किंमतीचा ऐवज जप्त कण्यात आला असून विविध भागातल्या दहा जुगारींविरूद्ध धुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी ही धडाकेबाज कारवाई केली. याप्रकरणी सिद्धेश संजय बच्छाव यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून निलेश गोविंद मेटकर रा. बिलाडी रोड, धुळे दत्तू मोतीराम मैंद रा. रावळगाव (ता. मालेमाव) पंकज गिरधर हिरे, रा. साक्री, गणेश मारोजी अजळकर रा. चितोड रोड, धुळे, हेमंत अशोक नेरकर रा. कुमार नगर, धुळे, भटू भिमराव केदार, रा. कोठर खु, (ता. मालेगाव), सुनिल भिमराव पगारे, रा. भिम नगर, धुळे, योगेश झिरे, प्रविण बापूराव पाटील दोन्ही रा. वार कुंडाणे (ता. धुळे) व ललील शरद जाधव रा. अंतापूर (ता. सटाणा, जि. नाशिक) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर