पुणे, 10 मे (हिं.स.)।
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे जोरदार उत्तर देत आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केल्यानंतर 7 मे रोजी पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागात गोळीबार केला.
तर 8 मे रोजी पाकिस्तानने भारताच्या अनेक भागांना मिसाईल आणि ड्रोनद्वारे लक्ष्य केले होते. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना हवेतच नष्ट केले. सलग दुसऱ्या दिवशीही पाकिस्तानने भारताच्या काही भागांवर ड्रोन आणि मिसाईलद्वारे हल्ला केला. मात्र, भारताने नापाक हल्ले परतावून लावले आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दोन्ही देशांना संयम ठेवण्याचं आणि शांतता बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी एक विधान केलं आहे. त्यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शरद पवार म्हणाले, भारत-पाकिस्तान तणावावर “बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते, असं शरद पवार म्हणाले. बारामतीत येथे शरद पवार यांना भारत-पाकिस्तान तणावावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून होणाऱ्या अपीलबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी हे विधान केलं आहे.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु