देशातील 9 विमानतळांहून तुर्की कंपनीची हकालपट्टी
सिक्युरिटी क्लियरन्स कंपनीची मंजुरी तत्काळ रद्द नवी दिल्ली, 15 मे (हिं.स.) : पाकिस्तानची मदत करणाऱ्या तुर्कीला आज, गुरुवारी भारताने जोरदार दणका दिला आहे. भारताच्या 9 विमानतळांमवर सिक्युरिटी क्लियरन्स (सुरक्षा मंजुरी) रद्द करण्यात आली आहे. नागरी उड्ड
प्रतिकात्मक छायाचित्र


सिक्युरिटी क्लियरन्स कंपनीची मंजुरी तत्काळ रद्द

नवी दिल्ली, 15 मे (हिं.स.) : पाकिस्तानची मदत करणाऱ्या तुर्कीला आज, गुरुवारी भारताने जोरदार दणका दिला आहे. भारताच्या 9 विमानतळांमवर सिक्युरिटी क्लियरन्स (सुरक्षा मंजुरी) रद्द करण्यात आली आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाच्या आदेशानुसार सेलेबी ग्राऊंड हँडलिंग इंडिया प्रा.लि. या कंपनीची सुरक्षा मंजुरी तत्काळ प्रभावाने रद्द केली.

भारताची तुर्कीच्या कंपन्यांविरोधातील पहिली स्पष्ट कारवाई असून, गेल्या काही वर्षांत भारताने तुर्कीएच्या पारंपरिक विरोधकांशी - ग्रीस, आर्मेनिया, सायप्रस तसेच सौदी अरेबिया व युनायटेड अरब एमिरात यांच्याशी संबंध वाढवले आहेत. सेलेबी एव्हिएशनने भारतात जागतिक दर्जाच्या ग्राउंड हँडलिंग सेवा देण्याच्या उद्देशाने प्रवेश केला. भारतात येताच त्यांनी 2 स्वतंत्र संस्था स्थापन केल्या होत्या. 1) सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया (ग्राउंड हँडलिंग संचालनासाठी)

2) सेलेबी दिल्ली कार्गो टर्मिनल मॅनेजमेंट इंडिया (दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मालवाहतूक सेवा हाताळण्यासाठी)

तुर्की, पाकिस्तान आणि अझरबैजान हे तीन देश व्यापार, बँकिंग आणि पर्यटन यामार्फत एकमेकांशी निकट संबंध ठेवतात. त्यांच्या लष्करी बाबतीतही सहकार्य आहे. यावेळी, भारताने पाकिस्तान आणि पाक-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइक (ऑपरेशन सिंदूर) नंतर तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला. सोबतच भारतावर 8 मे रोजी झालेल्या ड्रोन हल्ल्यांपैकी बहुतांश ड्रोन तुर्कीच्या बनावटीचे होते. ऑपरेशन सिंदूर सुरू होण्यापूर्वी एक तुर्की युद्धनौका कराची बंदरात दाखल झाली होती आणि काही वेळात तुर्की हवाई दलाचे सी-130 विमान तिथे उतरले होते. तुर्कीच्या पाकिस्तानला दिलेल्या समर्थनामुळे भारतात मोठा जनआक्रोश उसळला आहे. तुर्कीमधील पर्यटन आणि व्यापारावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सोशल मीडियावर झपाट्याने पसरले आहे.भारतीय पर्यटक तुर्कीतील प्रवास रद्द करत आहेत आणि बुकिंग वेबसाईट्स तुर्कीचे टूर पॅकेजेस रद्द करत आहेत. तुर्कीला पर्यटनातून मिळणाऱ्या महसुलात यामुळे मोठी घट होण्याची शक्यता आहे. कारण तुर्कीचा 12 टक्के महसूल पर्यटनावर आधारित आहे. तसेच जेएनयूसह अनेक भारतीय विद्यापीठांनी तुर्कीशी असलेले शैक्षणिक करार रद्द केले आहेत.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande