चंद्रपूर, 20 मे (हिं.स.)।येथील सरदार पटेल महाविद्यालयातील संगणक विज्ञान आणि अनुसंधान विभागातील प्राध्यापक डॉ. संदीप शंकरराव गुडेल्लीवार यांना वेल फाउंडेशनतर्फे ‘रवींद्र रत्न पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला आहे.हा पुरस्कार त्यांच्या संगणक क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेता त्यांना देण्यात आला.
डॉ. गुडेल्लीवार हे संशोधन क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्यांनी अकादमी आणि औद्योगिक जगतातील दरी भरून काढण्यासाठी अनेक संशोधन उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. 'नव्या तंत्रज्ञानांवर आधारित त्यांचे संशोधन आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम' यावर त्यांचा अभ्यास उल्लेखनीय आहे.
सदर राष्ट्रीय पुरस्कार डॉ. गुडेल्लीवार यांनी त्यांच्या आई-वडील व पत्नी यांना समर्पित केला. त्यांनी आपल्या कुटुंबीयांचे, व्यवस्थापनाचे, प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. बी. किशोर, सरदार पटेल महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, सहकारी मित्र व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
दरम्यान, सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्यकारी अध्यक्ष किशोर जोरगेवार (आमदार), उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळ कार्यकारिणी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव