रत्नागिरी : क्षत्रिय मराठा मंडळातर्फे गुणवंत मराठा विद्यार्थ्यांचा ७ जून रोजी सत्कार
रत्नागिरी, 20 मे, (हिं. स.) : येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे क्षत्रिय मराठा मंडळातर्फे गुणवंत मराठा विद्यार्थ्यांचा येत्या ७ जून रोजी सत्कार करण्यात येणार आहे. मराठा मंडळातर्फे दरवर्षी मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन
रत्नागिरी : क्षत्रिय मराठा मंडळातर्फे गुणवंत मराठा विद्यार्थ्यांचा ७ जून रोजी सत्कार


रत्नागिरी, 20 मे, (हिं. स.) : येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे क्षत्रिय मराठा मंडळातर्फे गुणवंत मराठा विद्यार्थ्यांचा येत्या ७ जून रोजी सत्कार करण्यात येणार आहे.

मराठा मंडळातर्फे दरवर्षी मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. इयत्ता दहावी व बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असते, हे लक्षात घेऊन रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात दहावीच्या परीक्षला ८५ टक्के अथवा अधिक गुण आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये ८० टक्के अथवा अधिक गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता, माळनाका येथील देसाई बॅंक्वेट हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे.

याकरिता मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत आणि शाळा सोडल्याचा दाखला सत्यप्रत अथवा कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचे लीव्हिंग सर्टिफिकेटची सत्यप्रत दि. १ जूनपर्यंत दुपारी १.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेत (सोमवार व शासकीय सुटीचे दिवस सोडून) मंडळाच्या बेसमेंट स्टोअर क्र. 3, बी विंग, सिद्धिविनायक रेसिडेन्सी, मजगाव रोड, रत्नागिरी या कार्यालयात जमा करावी किंवा 7887490856 किंवा 8552031997 या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावी, असे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande