सिन्नरला वीज कोसळून युवकाचा मृत्यू
अवघ्या 4 तासांमध्ये 30 मिलिमीटर पाऊस नाशिक, 20 मे (हिं.स.) - जिल्ह्यामध्ये मंगळवारी झालेल्या पावसामुळे सिन्नर तालुक्यात विज पडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे तर शहरांमध्ये विविध ठिकाणी वीज मंडळाच्या वाहिनी वरती झाड कोसळल्याने ऐन सायंकाळच्या वेळी अर
पावसामुळे वीज पडून सिन्नरला युवकाचा मृत्यू, चार तासांमध्ये 30 मिलिमीटर पडला पाऊस


अवघ्या 4 तासांमध्ये 30 मिलिमीटर पाऊस

नाशिक, 20 मे (हिं.स.) - जिल्ह्यामध्ये मंगळवारी झालेल्या पावसामुळे सिन्नर तालुक्यात विज पडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे तर शहरांमध्ये विविध ठिकाणी वीज मंडळाच्या वाहिनी वरती झाड कोसळल्याने ऐन सायंकाळच्या वेळी अर्धे शहर हे अंधारात बुडाले होते.तर वेधशाळेच्या वतीने पुन्हा एकदा नाशिक शहराला पावसासाठी सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपासून साडेआठ वाजेपर्यंत सुमारे 30.6 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद जिल्ह्यामध्ये झालेले आहे या चार तासांमध्ये अक्षरशः पावसाने झोडपून काढलेला आहे नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा दणका हा सातत्याने चालू आहे मागील सर्व साधारण पंधरा दिवसापासून अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला चांगलेच झोडून काढलेले आहे त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे सिन्नर तालुक्यातील सोनगिरी या गावामध्ये रवींद्र प्रभाकर बोडके नामक 34 वर्षीय युवक हा वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडल्याची घटना घडलेली आहे नांदगाव तालुक्यातील मौजे कुसुमतेल येथील बाळू ढवळू मेंगाळ यांचा बैल मंगळवारी सर्व साधारण 5 च्या पावसात वीज पडून मयत झाला, कळवण तालुक्यातील भेंडी गावात शांताराम भाऊराव साळवे यांच्या घराचे पत्रे उडाले असून नुकसान झाले आहे. दरम्यान वेधशाळेच्या वतीने पुन्हा एकदा नाशिक साठी सावधानतेचा इशारा देण्यात आला असून पुन्हा एकदा जोरदार बेमोसमी पावसाच सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande