
भंडारा, 31 मे (हिं.स.)।
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील साखळी जंगल शिवारात अवैधरित्या हातभट्टीद्वारे मोहफुल दारू गाळप केली जात असल्याची माहिती तुमसर पोलिसांना मिळाली. तुमसर पोलिसांनी साखळी जंगल शिवारातील ऋषीदेव पहाडीच्या मागील भागात पवनारा-चिचोली नाला परिसरात धाड घातली असता मोहफुल दारू गाळप करताना दिसून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून ४ लाख ४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून १३५ प्लॉस्टीक पिशव्यामध्ये सडवा मोहफुल, ८० लीटर हातभट्टी दारू व इतर साहित्य असा जवळपास ४ लाख ४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून काही मुद्देमाल घटनास्थळी नष्ट करण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar