अमरावती : देवांशु फरकाडे हत्याकांडात पाच आरोपींना अटक
अमरावती, 8 मे (हिं.स.)खुन्नस इंस्टाग्रामच्या पोस्टवर भडकल्याने तब्बल ८ जणांनी गोपाल नगरात देवांशू फरकाडेची हत्या केली होती. या बाबत राजापेठ पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन अल्पवयीनाचा समावेश आहे. तर अन्य तीन अल्पवयीन आ
देवांशु फरकाडे हत्याकांडात पाच आरोपींना अटक अटकेतील २ अल्पवयीन, तीन अल्पवयीन फरार


अमरावती, 8 मे (हिं.स.)खुन्नस इंस्टाग्रामच्या पोस्टवर भडकल्याने तब्बल ८ जणांनी गोपाल नगरात देवांशू फरकाडेची हत्या केली होती. या बाबत राजापेठ पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन अल्पवयीनाचा समावेश आहे. तर अन्य तीन अल्पवयीन आरोपी फरार असून शोध सुरु आहे. हर्षद जाधव (१८) रा.माया नगर, राज आठवले (२०), ओम खडसे (१८) दोन्ही रा. ज्योती कॉलनी, दोन अल्पवयीन अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर मृतकचे नाव देवांशू अनिल फरकाडे (२२) असे आहे.

माहितीनुसार, गोपाल नगर भागातील रहिवासी देवांशू फरकाडे याचा वरील नमूद व इतर आरोपींसह कोणत्यातरी कारणावरून बराच जुना वाद सुरू होता. मध्यतरीच्या काळात इंस्टग्रामवर आरोपी व देवांशू बघून घेण्याची धमकी देण्याच्या पोस्ट एकमेकांविरोधात अपलोड करित होते. पोस्ट येणाऱ्या कमेन्ट वाढत असल्याने इंस्टग्रामवर आरोपी देवांशूचे पोस्ट वर आणखीच भडकले. त्यामुळे आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून देवांशूची हत्या करण्याच्या प्रयत्नात होते. अनेकवेळा त्यांनी देवांशूला हेरून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न सुध्दा केला. परंतु, या ना त्या कारणाने आरोपींचा प्रयत्न फसला. त्यामुळे आरोपी देवांशूचा गेम

करण्याची संधी शोधत होते. नगर भागात देवांशू आरोपींच्या तडाख्यात सापडला. आरोपींनी एकापोठ चाकूने त्याच्यावर सपासप वार केले. त्यामुळे देवांशू रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.

गोपाल नगरात देवांशूचे हत्याकांड झाल्यानंतर राजापेठ डीबीस्कॉड, क्राईम ब्रांच, सीपी स्पेशल स्कॉडने युध्दपातळावर आरोपींची शोधमोहिम सुरू केली. बहुतांश आरोपी हे बाहेरगावी पळून गेले. अशातच राजापेठ पोलिसांनी मंगळवारी रात्रीत रेल्वेने अन्य शहरात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या राज आठवले, ओम खडसे, हर्षद जाधव या तिघांना अटक केली. पोलिसांनी अन्य दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande