जळगाव , 8 मे (हिं.स.)पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक शिवारात शेततळ्यात पडून दोन शेतमजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये रवी परभत कोळी (वय 14, रा. पुनगाव) आणि पदमसिंग भगवान पाटील (वय 21, रा. अंतुर्ली बुद्रुक) यांचा समावेश आहे. दोघेही शेतमजुरीचे काम करत होते.
सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक निळू पाटील आणि सागर पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर