रेल्वेस्थानकावर चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाईल सह प्रवाशाच्या बॅगा पळविण्याचे प्रकार वाढले
अमरावती, 8 मे (हिं.स.)। बडनेरा रेल्वेस्थानकावर चोरट्याचा धुमाकूळ झाला असून प्रवाशांचे दागिने, मोबाईल, नगदी रक्कम तसेच बॅग उडवणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून सुरक्षेच्या नावाखाली कर्तव्य बसवणारे पोलिस तसेच रेल्वे सुरक्षा दल त्यांच्याशी लागेब
रेल्वेस्थानकावर चोरट्यांचा धुमाकूळ मोबाईल सह प्रवाशाच्या बॅगा पळविण्याचे प्रकार वाढले रेल्वे पोलीस कुंभकर्णी झोपेत


अमरावती, 8 मे (हिं.स.)।

बडनेरा रेल्वेस्थानकावर चोरट्याचा धुमाकूळ झाला असून प्रवाशांचे दागिने, मोबाईल, नगदी रक्कम तसेच बॅग उडवणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून सुरक्षेच्या नावाखाली कर्तव्य बसवणारे पोलिस तसेच रेल्वे सुरक्षा दल त्यांच्याशी लागेबांधे असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांचा सामना करत प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

रेल्वेस्थानकावर प्रवेश केल्या नंतर महिला प्रवाशांचे दागिने व मोबाईलसह नगदी रक्कम व त्यांच्या बॅगा हातोहात लंपास करण्यात येतात. चोर हे पटाईत असल्याने तर रेल्वे पोलिस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने दिसून येत आहे.बडनेरा रेल्वेस्टेशन हे महत्त्वाचे ठिकाण असून याठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात रेल्वे अनेक ठिकाणी जातात. यामुळे येथे हजारो प्रवासी मोठ्याप्रमाणात प्रवास करतात या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे आपली संधी साधताना दिसतात.

यामुळे अनेक प्रवाशांचे मोबाईल हातातून घेऊन पळ काढतात. विना तिकीट प्रवासी प्लॅटफॉर्मवर येण्याची हिंमतदेखील दाखवत नाही; मात्र चोरट्यांना रेल्वे स्थानकावर प्रवेश कसा मिळतो, असा प्रश्नदेखील उपस्थित होतो. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासीवर्गात असलेल्या चोरीच्या घटना घडल्या जात आहे. प्रवासी वर्ग सुरक्षित नाही.

प्रवाशाला तक्रार करायची वाटल्यास कुठे झंझट नको म्हणत पुढचा प्रवास सुरू करतो, चोरी गेलेले वस्तू परत तसेच मिळत नसल्यामुळे प्रवासी वर्गात नाराजीची भावना असल्याचे दिसून येते. तरी याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी प्रवासी वर्गातून ऐकण्यास मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande