सोलापूर, 8 मे (हिं.स.)।
दुबई, थायलंड व दिल्ली येथे आमच्या इन ऑटो हॉलिडेज कंपनीचे कार्यालय असून त्यातून ट्रॅव्हल्स कंपनीसाठी विमान, बस व हॉटेल्स तिकिटे देतो, असे सांगितले. तोंडी करार करून दोन ट्रीप यशस्वी करून शैलेश बिरणप्पा बिडवे (रा. मेहकर, ता. भालकी, बिदर) याने ३१ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद विशाल विजय हुंडेकरी (रा. जुळे सोलापूर) यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे.
इन ऑटो हॉलिडेज कंपनीचा मी सोलापूरचा प्रतिनिधी आहे. आमच्या कंपनीकडून टुर्सची तिकिटे सवलतीत दिली जातात, असे आमिष संशयित आरोपीने दिले. विमान, बस आणि हॉटेल्स व जेवणाची सोय आमची कंपनी करून देते, असेही शैलेश बिडवे याने सांगितले. त्याने तोंडी करार करून दोन ट्रीप यशस्वी केल्या.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड