अल्पवयीन मुलीस गर्भवती करणा-या आरोपीस १० वर्षे सक्त मजुरी
अहिल्यानगर, 1 जून (हिं.स.)। अल्पवयीन मुलीस बळजबरीने शरीरसंबंध ठेवून गर्भवती केल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी आरोपी नामे शिरीष उर्फ मुन्ना भाउसाहेब कावले, वय ३८ वर्षे, रा. कावले वस्ती,शहर टाकळी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर याला
अल्पवयीन मुलीस गर्भवती करणा-या आरोपीस १० वर्षे सक्त मजुरी


अहिल्यानगर, 1 जून (हिं.स.)।

अल्पवयीन मुलीस बळजबरीने शरीरसंबंध ठेवून गर्भवती केल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी आरोपी नामे शिरीष उर्फ मुन्ना भाउसाहेब कावले, वय ३८ वर्षे, रा. कावले वस्ती,शहर टाकळी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर याला भा.द.वि. कलम ३७६ (२) (जे) (एन), ४५२, ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ४ व ८ या अन्वये दोषी धरून आरोपीस भा.द.वि. कलम ३७६ (२) (जे) (एन), ४५२, ५०६ नुसार १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रू. ५०००/- दंड न भरल्यास दोन महिने साथी कैद, भा.द.वि. कलम ४५२ नुसार ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रू. ३०००/- दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, भा.द.वि कलम ५०६ नुसार १ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रू. १०००/- दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील अॅड. मनिषा पी. केळगंद्रे शिंदे यांनी काम पाहिले.

सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी की,5 जून 2023 रोजी पिडीत मुलीचे आई हिने शेवगाव पोलीस स्टेशनला आरोपी नामे शिरीष उर्फ मुन्ना भाउसाहेब कावले याने पिडीत ही घरात एकटी असताना तिचेशी बळजबरी करून तिच्यासोबत शारीरीक संबंध करून गर्भवती केल्या प्रकरणी भा.द.वि. कलम ३७६ (१) (२) (जे) (एन), ४५२, ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ३,४,५ (२) (एल) ७ व ८ अन्वये फिर्याद दिलेली होती. त्यानंतर सदर प्रकरणी पिडीतेने पोलीसांसमोर जबाब दिला होता की, २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ च्या सुमारास पिडीत मुलगी घरी एकटी असताना तिचे आईवडील शेतात कामावर गेले असताना, गावातील राहणारा आरोपी शिरीष उर्फ मुन्ना भाउसाहेब कावले हा पाणी पिण्याच्या निमित्ताने घरी आला व पिडीते ला बळजबरी करू लागला त्यावेळी पिडीतेने नकार दिला असता, आरोपी तिला म्हणाला की, मला तू खूप आवडतेस, तुझ्‌यासोबत लग्न करायचे आहे. तू जर माझ्‌यासोबत लग्न केले नाही तर मी तुला व तुझे आईवडीलांना जीवे मारून टाकीन अशी धमकी देउन आरोपीने पिडीतेसोबत बळ जबरीने शारीरिक संबंध केले. त्यानंतर आरोपी हा पिडीत एकटी घरी असताना नेहमी पिडीतेच्या घरी यायचा व तिचे सोबत बळजबरीने शरीर संबंध करायचा व धमकी देउन निघून जायचा. पिडीत आरोपीच्या धमकीला घाबरलेली असल्याने तिने तिच्या आईवडीलांना काही सांगितले नाही. परंतु पिडीतेचे पोट दूखत असल्याने व आरोपीने पिडीतेवर वेळोवेळी शारीरीक संबंध केल्याने पिडीतेस आरोपीपासून दिवस गेले असल्याचे सांगितले होते.पिडीतेचा जबाब घेतल्यानंतर पोलीसांनी पिडीतेस मेडीकल तपासणी साठी सुरूवातील ग्रामीण रुग्णलयात व त्यानंतर नगर येथील सिवील हॉस्पीटल येथे पाठविले. पिडीत मुलीचे वय कमी असल्याने सिवील हॉस्पीटल येथे पिडीतेचा गर्भपात करण्यात आला. घटनेचा संपूर्ण तपास शेवगाव येथील सहा. पोलीस निरीक्षक आशीष शेळके यांनी करून न्यायालयात आरोपींविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले.या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण १८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी तसेच पिडीत मुलीचे आई, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी स.पो.नि, आशीष शेळके तसेच वयासंदर्भात मुख्याध्यापक, शेवगाव पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी भारत चौरे त्याचबरोबर पिडीतेच्या उपचारासंबंधात शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमावत, डॉ. दुवाडा तसेच अ.नगर सिवील हॉस्पीटल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पगारीया, डॉ. घुगरे, डॉ. उंदरे, डॉ. मंगेश राउत, डॉ. स्नेहल इंगळे यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्याचबरोबर पिडीत मुलीच्या गर्भाच्या अंशाच्या चाचणीबाबत नाशिक वैद्यकीय प्रयोगशाळा येथील रासायनिक अधिकारी मारूती घुगे यांची साक्ष नोंदविण्यात आली.या केसची सुनावणी चालु असता ना सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की, पिडीत मुलगी ही घटनेच्या वेळी केवळ १६ वर्षर्षाची होती. आरोपी चे वय ३८ वर्ष होते. तसेच घटनेच्या वेळी आरोपीचे लग्न झालेले असताना देखील आरोपीने अल्पवयीन असलेल्या पिडीत मुलीवर बळजबरी करून तिला धमकी देउन गर्भवती केलेले आहे. तसेच गर्भवती झाल्याने पिडीत मुलीवर अतिशय कमी वयामध्ये गर्भपात करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तिच्या शरीरावर गर्भपाताच्या शस्त्रक्रिये च्या खुणा आढळून येतात, त्यामुळे तिच्या भविष्यावर या गोष्टीचा मोठापरिणाम होणार आहे. अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो व त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांचे मनावर पडतात. आरोपीने अत्यंत वाईट पध्दतीने सदरची घटना केलेली आहे. त्यामुळे आरोपीला जर या केसमध्ये निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande