व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत २४ रुपयांनी कपात
नवी दिल्ली, १ जून (हिं.स.) : देशभरात आजपासून (१ जून) १९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती २४ रुपयांनी कमी झाल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि ढाबे आदीं
व्यावसायिक गॅस सिलिंडर


नवी दिल्ली, १ जून (हिं.स.) : देशभरात आजपासून (१ जून) १९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती २४ रुपयांनी कमी झाल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि ढाबे आदींना याचा फायदा होणार आहे.

देशभरातील प्रमुख शहरांतील नवे दर पाहिल्यास दिल्लीत सिलिंडरची किंमत १७२३.५० रुपये, मुंबईत १६७४.५० रुपये, कोलकातात १८२६ रुपये, चेन्नईत १८८१ रुपये, बंगळुरूत १७९६.५० रुपये, नोएडामध्ये १७२३.५० रुपये, चंडीगडमध्ये १७४३ रुपयांना मिळेल.

व्यावसायिक सिलिंडरचे दर सलग तिसऱ्या महिन्यात कमी झाले आहेत. याआधी मे महिन्यात १४.५ रुपयांनी तर एप्रिल महिन्यातही ४१ रुपयांनी या सिलिंडरचे दर कमी करण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande