शुभमनसाठी संघाचे नेतृत्व करणे सोपे नसेल - रवी शास्त्री
लंडन , 20 जून (हिं.स.)।भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलसाठी इंग्लंडमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व करणे सोपे नसेल आणि यशासाठी त्याला संयमाने काम करावे लागेल, असे भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हणलं आहे. रवी शास्त्री या
Ravi shastri


लंडन , 20 जून (हिं.स.)।भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलसाठी इंग्लंडमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व करणे सोपे नसेल आणि यशासाठी त्याला संयमाने काम करावे लागेल, असे भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हणलं आहे.

रवी शास्त्री यांनी ‘आयसीसी रिव्ह्यू’ मध्ये म्हटले आहे की, मला वाटते की त्याला वेळ द्यावा लागेल.” ते म्हणाले, “ते सोपे नसेल. त्याला एक कठीण काम देण्यात आले आहे. त्याला इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करावे लागेल. गिलने आतापर्यंत ३२ कसोटी सामने खेळले आहेत आणि ३५.०५ च्या सरासरीने १८९३ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने २००७मध्ये इंग्लंडमध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. इंग्लंडचा दौरा गिलसाठी शिकण्याची चांगली संधी असू शकतो असे शास्त्री मानतात. तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. हे सोपे नाही पण मला वाटते की तो खूप काही शिकेल.

विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट बदलाच्या टप्प्यातून जात आहे. अशा वेळी, बीसीसीआयने भारतीय कसोटी संघाची कमान गिलकडे सोपवली आहे. भारतीय संघाने आजपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात केली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande