अखिल विश्व वारकरी परिषदेच्या प्रदेश कार्यध्यक्षपदी साहेबराव पाचरणे
अहिल्यानगर, 4 जून, (हिं.स.) :- अखिल विश्व वारकरी परिषदेच्या प्रदेश कार्यध्यक्षपदी येथील साहेबराव पाचरणे याची निवड करण्यात आली.तसे पत्र आज प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते यांनी त्यांना दिले.त्यांच्या निवडीबद्दल नालेगाव येथील धर्मवीर संभाजी युवा प्रतिष्ठान
अखिल विश्व वारकरी परिषदेच्या प्रदेश कार्यध्यक्षपदी साहेबराव पाचरणे


अहिल्यानगर, 4 जून, (हिं.स.) :- अखिल विश्व वारकरी परिषदेच्या प्रदेश कार्यध्यक्षपदी येथील साहेबराव पाचरणे याची निवड करण्यात आली.तसे पत्र आज प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते यांनी त्यांना दिले.त्यांच्या निवडीबद्दल नालेगाव येथील धर्मवीर संभाजी युवा प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगरसेवक अजय चितळे यांनी त्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी दत्ताभाऊ वामन,विनायक वाघ,विशाल बेरड,अतुल वामन आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते. नियुक्ती पत्रात म्हटले आहे की ह.भ.प.साहेबराव पाचरणे, अहिल्यानगर यांची अखिल विश्व वारकरी परिषदे च्या प्रदेश कार्याध्यक्ष यापदी निवड करण्यात आली आहे.ही निवड तीन वर्षासाठी असेल.वारकरी सांप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच समाजप्रबोधनातून सकळ जनांचे कल्याण ही परिषदेची विचारधारा आहे.या विचारधारेला अनुसरूनच आपल्या आजवरच्या कार्याची वाटचाल सुरू आहे.आपल्या हातून हे कार्य भविष्यात आणखी जोमाने होईल या दृढ विश्वासातून आपली वरील पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. साहेबराव पाचरणे यांच्या निवडी बद्दल अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande