डीडीसीएसाठी गौरवाचा क्षण; अरुण जेटली स्टेडियमला ‘बेस्ट पिच अ‍ॅण्ड ग्राउंड’ पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, ४ जून (हि.स.) : इंडियन प्रीमियर लीग आयपीएल २०२५ च्या यशस्वी आयोजनानंतर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) साठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने अरुण जेटली स्टेडियमला ‘बेस्ट पिच अ‍ॅण्ड ग्राउंड’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ह
अरुण जेटली स्टेडियमला ‘बेस्ट पिच अ‍ॅण्ड ग्राउंड’ पुरस्कार


नवी दिल्ली, ४ जून (हि.स.) : इंडियन प्रीमियर लीग आयपीएल २०२५ च्या यशस्वी आयोजनानंतर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) साठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने अरुण जेटली स्टेडियमला ‘बेस्ट पिच अ‍ॅण्ड ग्राउंड’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार मैदानावरील पिचची गुणवत्ता, बाह्य क्षेत्राची निगा आणि उत्कृष्ट मैदान व्यवस्थापन यासाठी दिला जातो.

या पुरस्कारामुळे आयपीएलदरम्यान मैदान व्यवस्थापनासाठी झटलेल्या ग्राउंड स्टाफच्या मेहनतीला मान्यता मिळाली आहे. अरुण जेटली स्टेडियमने खेळाडूंना स्पर्धात्मक खेळासाठी आदर्श पिच आणि प्रेक्षकांना दर्जेदार अनुभव प्रदान केला.

डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “हा पुरस्कार आमच्या स्टाफच्या अथक प्रयत्नांचे फळ आहे. आम्ही क्रिकेट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये उत्कृष्टतेचे उच्चतम निकष राखण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

डीडीसीएच्या उपाध्यक्षा शिखा कुमार यांनी सांगितले की, “हा सन्मान अरुण जेटली स्टेडियमला जागतिक दर्जाचे क्रिकेट मैदान बनवण्याच्या आमच्या ध्येयाला गती देणारा आहे. हा दिल्ली क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण आहे.”

डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा यांनी सांगितले की, “मैदानामागे काम करणाऱ्या टीमच्या समर्पणामुळे हा सन्मान मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांच्या व्यावसायिकतेचा आणि मेहनतीचा सन्मान आहे.”

संयुक्त सचिव अमित ग्रोवर आणि कोषाध्यक्ष हरीश सिंगला यांनीही या गौरवाबद्दल समाधान व्यक्त केले असून, खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी आणखी उत्तम सुविधा उभारण्याच्या दिशेने प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.

डीडीसीएने बीसीसीआयसह सर्व हितधारकांचे आभार मानले असून, भविष्यातही दर्जेदार क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिल्लीसाठी हा एक मानाचा क्षण असून, क्रिकेट विकासात डीडीसीएचे योगदान अधोरेखित करणारा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande