जळगाव - बसमध्ये चढताना बंडी कापून ५० हजार लंपास
जळगाव, , 4 जून (हिं.स.) जळगाव जामनेर बसमध्ये चढताना आजोबांची बंडी कापून चोरट्याने ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना सोमवारी (ता. २) दुपारी घडली. काशिनाथ गणपत डोंगरे (वय ७९) असे आजोबांचे नाव असून, ते नाशिक येथून जळगावात आले व जामनेरला जाण्यास
जळगाव - बसमध्ये चढताना बंडी कापून ५० हजार लंपास


जळगाव, , 4 जून (हिं.स.) जळगाव जामनेर बसमध्ये चढताना आजोबांची बंडी कापून चोरट्याने ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना सोमवारी (ता. २) दुपारी घडली. काशिनाथ गणपत डोंगरे (वय ७९) असे आजोबांचे नाव असून, ते नाशिक येथून जळगावात आले व जामनेरला जाण्यासाठी बसमध्ये बसताना ही घटना घडली. जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील अल्पभूधारक शेतकरी असलेले काशिनाथ डोंगरे पत्नीसोबत नाशिक येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले हेाते. तेथून बसने जळगाव बसस्थानकात पेाहोचले. बसस्थानकात साधारण दुपारी तीनच्या सुमारास उभ्या असलेल्या जळगाव-जामनेर बसमध्ये हे दांपत्य बसले. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने दाटीवाटीने आत शिरताना काशिनाथ डोंगरे यांच्या बंडीचा खिसा कापूस ५० हजार रुपये चोरट्याने लंपास केल्याचे त्यांनी बंडीत हात घातल्यानंतर समजले. त्यांनी बसमध्ये शोध घेतला. मात्र, जवळ बसलेला व्यक्ती निघून गेला हेाता. तेथून दोघेही जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात आले. पोलिसांत तक्रार दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्‍हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande