मुंबई, 4 जून, (हिं.स.)। बिग बॉस या लोकप्रिय रियालिटी शोचा १९ वा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिजनमध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री मुनमुन दत्ता हे देखील दिसणार असल्याची बातमी समोर आली आहे.'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम बबिताजीच्या भूमिकेतून मुनमुन घराघरात पोहचली आणि लोकप्रिय झाली. ती आता बिग बॉस या रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान, बिगबॉस च्या नव्या सिझनमध्ये सलमान खान पुन्हा एकदा होस्टिंग करताना पाहायला मिळणार आहे. या सिजनमध्ये बिग बॉसच्या घरात कोण कोण सदस्य दिसणार याची चर्चा सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निर्मितीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की 'बिग बॉस १९' च्या निर्मात्यांनी मुनमुन दत्ताशी संपर्क साधला आहे. मात्र, अद्याप काहीही निश्चित झालेले नाही, असे सांगितले जात आहे. यामुळे मुनमुन दत्ता या बिग बॉस या रियालिटी शोची सदस्य होणार का नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
मुनमुन दत्ताला 'बबिता जी' या पात्रामुळे मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. पण अनेकदा ती वादातही राहिली आहे. 'बिग बॉस १९' मध्ये डेझी शाह, 'बालिका वधू' फेम जग्या म्हणजेच शशांक व्यास, शरद मल्होत्रा, राम आणि गौतमी कपूर, खुशी दुबे आणि मून बॅनर्जी हे कलाकार सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, जून महिन्याच्या अखेरीस 'बिग बॉस १९' चा प्रोमो शूट केला जाऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode