विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूरच्या 'ऑंखो की गुस्ताखियॉं' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित
मुंबई, 4 जून (हिं.स.)।बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता विक्रांत मेस्सी लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ''ऑंखो की गुस्ताखियॉं'' असं या नव्या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात अभिनेते संजय कपूर यांची लेक शनाया कपूर ही
Vikrant messi


मुंबई, 4 जून (हिं.स.)।बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता विक्रांत मेस्सी लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'ऑंखो की गुस्ताखियॉं' असं या नव्या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात अभिनेते संजय कपूर यांची लेक शनाया कपूर ही मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शनाया तिच्या डेब्यू फिल्ममध्ये विक्रांत मेस्सीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकतंच 'ऑंखो की गुस्ताखियॉं' रोमॅन्टिक चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. तसंच चित्रपटाच्या रिलीज डेटवरून पर्दा हटविण्यात आला आहे.

ऑंखो की गुस्ताखियॉं' या चित्रपटाच्या प्रदर्शित केलेल्या पोस्टरमध्ये शनाया लाल रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. तर विक्रांत मेस्सी तपकिरी जॅकेट आणि काळ्या जीन्समध्ये पाहायला मिळतो आहे. शिवाय विक्रांत मेस्सी कधीही न पाहिलेल्या अंदाजात दिसतो आहे. या पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. येत्या ११ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

संतोष सिंग यांनी 'ऑंखो की गुस्ताखियॉं' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर मानसी बागला आणि वरुण बागला यांची निर्मीती आहे. दरम्यान, या चित्रपटाद्वारे विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूरची जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक रस्किन बाँड यांच्या कथेवर आधारलेला आहे. या प्रेमकथेत दोन भिन्न पात्रांचा प्रवास पाहायला मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande