ट्रम्प यांनी स्टील व अॅल्युमिनियमवरील आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवला; यूकेला सूट
वाशिंगटन, ४ जून, (हिं.स.) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात स्टील आणि अॅल्युमिनियमवरील टॅरिफ (शुल्क) दुप्पट करून ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आदेश दिला आहे. हा निर्णय आज पासून लागू होणार आहे. ट्रम्प यांच्या मते, ही पावले राष्ट्रीय
वाशिंगटन


वाशिंगटन, ४ जून, (हिं.स.) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात स्टील आणि अॅल्युमिनियमवरील टॅरिफ (शुल्क) दुप्पट करून ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आदेश दिला आहे. हा निर्णय आज पासून लागू होणार आहे. ट्रम्प यांच्या मते, ही पावले राष्ट्रीय सुरक्षा आणि देशांतर्गत उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक आहेत.

नवीन शुल्क डेरिव्हेटिव्ह उत्पादनांनाही लागू होईल. कॉमर्स सेक्रेटरी हार्वर्ड लुटनिक यांनी सध्याच्या उद्योग स्थितीवर अद्ययावत माहिती दिल्यानंतर हा निर्णय घेतला.

अधिकांश देशांना ५० टक्के टॅरिफ लागू होईल, पण यूकेसाठी २५ टक्के शुल्क कायम राहणार आहे कारण त्यांच्याशी विशेष व्यापार करार आहे. मात्र, कराराच्या अटींचे उल्लंघन झाल्यास यूकेसाठीही शुल्क वाढवले जाऊ शकते.

ट्रम्प यांनी म्हटले आहे की, या टॅरिफमुळे आयात स्टील आणि अ‍ॅल्युमिनियममुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका होणार नाही. २०१८ मध्ये सुरू झालेल्या या टॅरिफमुळे अमेरिकेत स्टीलच्या किंमती १६ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

या निर्णयामुळे अमेरिकेच्या व्यापार धोरणात मोठा बदल झाला असून, देशांतर्गत उत्पादनांना प्राधान्य देण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande