अभिनेता प्रथमेश परबच्या 'गाडी नंबर १७६०' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
मुंबई, 5 जून (हिं.स.)।मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ''गाडी नंबर १७६०'' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गाडी नंबर १७६० या चित्रपटाचा टीझरमध्ये एका काळ्या बॅगेभोवती फिरणारी ग
'गाडी नंबर १७६० movie


मुंबई, 5 जून (हिं.स.)।मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या 'गाडी नंबर १७६०' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

गाडी नंबर १७६० या चित्रपटाचा टीझरमध्ये एका काळ्या बॅगेभोवती फिरणारी गोष्ट उलगडताना दिसतेय. सुरुवातीलाच दाखवलेली पैशांनी भरलेली बॅग अचानक गायब होते आणि तिथून रहस्याने भरलेला आणि विनोदाने सजलेला प्रवास सुरू होतो. या चित्रपटात बॅगेच्या शोधात अनेक जण एकमेकांवर संशय घेताना, गोंधळात अडकताना दिसत आहेत. त्यामुळे एकीकडे रहस्य वाढतेय तर दुसरीकडे संवाद आणि प्रसंगांमधून विनोद प्रेक्षकांना खिळवून ठेवतोय. ही बॅग नेमकी कुठे गेली? हे चित्रपटगृहात पाहायला मिळेल. हा चित्रपट येत्या ४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'गाडी नंबर १७६०' चित्रपटात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. यात प्रथमेश परब , शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारखे उत्तम कलाकार आहेत. प्रत्येक पात्राची एक गूढ बाजू आहे आणि ती पडद्यावर उलगडताना या कलाकारांचा अभिनय चित्रपटाला अधिकच मनोरंजक बनवतो. या चित्रपटात विनोद, रहस्य, मिस्ट्री, ड्रामा सर्वकाही पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'गाडी नंबर १७६०' चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा योगिराज संजय गायकवाड यांनी सांभाळली आहे. तर चित्रपटाचे निर्मिती कैलाश सोराडी आणि विमला सोराडी यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande