अभिनेते पंकज त्रिपाठींच्या घरात चिमुकल्याचं आगमन
मुंबई, ५ जून, (हिं.स.) : सुप्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठींच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. बाळासोबतचा फोटो शेअर करत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. पंकज त्रिपाठी आणि आणि त्यांची पत्नी मृदुला काका-काकी झाले आहेत. हे बाळ अभिनेता परित
अभिनेते पंकज त्रिपाठी


मुंबई, ५ जून, (हिं.स.) : सुप्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठींच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. बाळासोबतचा फोटो शेअर करत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. पंकज त्रिपाठी आणि आणि त्यांची पत्नी मृदुला काका-काकी झाले आहेत.

हे बाळ अभिनेता परितोष त्रिपाठी यांचं असून, परितोष त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मीनाक्षी चंदन यांनी २३ मे रोजी त्यांच्या मुलीचं स्वागत केलं. त्यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सहभागी करून घेतलं आहे.

बहुत सारा प्यार असं परितोषने फोटो शेअर करत लिहिलं आहे.

सुनील शेट्टी आणि इतर कलाकारांनीही त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. या गोंडस क्षणात सहभागी झाल्यामुळे पंकज त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांच्या कौतुकाचा विषय ठरले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande