सोलापूर - ३६ लाखांचे मोबाईल चोरणार चोरटा जेरबंद
सोलापूर, 5 जून, (हिं.स.)। होटगी रस्त्यावरील क्रोमा शोरूम फोडून ३६ लाखांचे ७८ मोबाईल चोरणारा ठाण्यातील रामनिवास ऊर्फ रामा मंजू गुप्ता (वय ३७) याला सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने जेरबंद केले. चोरीच्या आदल्या
सोलापूर - ३६ लाखांचे मोबाईल चोरणार चोरटा जेरबंद


सोलापूर, 5 जून, (हिं.स.)। होटगी रस्त्यावरील क्रोमा शोरूम फोडून ३६ लाखांचे ७८ मोबाईल चोरणारा ठाण्यातील रामनिवास ऊर्फ रामा मंजू गुप्ता (वय ३७) याला सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने जेरबंद केले. चोरीच्या आदल्या रात्री त्याने आठच्या सुमारास शोरूममध्ये कसे शिरता येईल, शोरूमची रचना कशी आहे, याची रेकी केली होती अशी बाब समोर आली आहे.

संशयित रामनिवास याने मध्यरात्री होटगी रस्त्यावरील क्रोमा सेंटरमध्ये चोरी केली. तत्पूर्वी, त्याने शोरूममध्ये कसे जाता येईल, रात्री तेथे सुरक्षारक्षक असतो का, याची माहिती घेतली. त्याठिकाणी रंगकाम सुरू असल्याने लाकडी शिडी होती. या संधीचा फायदा घेऊन रामनिवास याने शटर न उचकटता त्या शिडीवरून दुकानावर असलेली काच फळीने फोडून दुकानात उडी घेतली. त्यावेळी सायरन वाजले होते, पण सुरक्षारक्षक नसल्याने तेथे कोणी आले नाही. ७८ लाखांचे मोबाईल चोरी झाल्याने शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज पाहिले, पण त्याने चेहरा कापडाने झाकल्याने पोलिसांना ओळख पटविता आली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande