उत्तराखंड : महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना मिळाली मदत
देहरादून, 2 जुलै (हिं.स.) : उत्तराखंड राज्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे आणि महापुरामुळे रस्ते वाहून गेले आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्रातील सुमारे 150 ते 200 पर्यटक याठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्
tourists stuck in uttrakhand


देहरादून, 2 जुलै (हिं.स.) : उत्तराखंड राज्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे आणि महापुरामुळे रस्ते वाहून गेले आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्रातील सुमारे 150 ते 200 पर्यटक याठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना मदत करण्याची विनंती केली. यानंतर तात्काळ एनडीआरएफच्या पथकाने धाव घेवून या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

गेल्या काही दिवसांपासून देवभूमी उत्तराखंडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने नद्यांना प्रचंड पूर आला असून दरडी कोसळून वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. यामुळे उत्तराखंडमधील यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात २८ जूनपासून राज्यातील सुमारे १५० हुन अधिक पर्यटक अडकून पडले होते. परतीच्या मार्गावर दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने त्यांना परत येता येत नव्हते. ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून ८ दिवस लागण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात होती. तिथे अडकलेल्या पर्यटकांनी आपल्यापर्यंत मदत पाठवण्याची आणि आपल्याला सुखरूप ठिकाणी हलवण्याची विनंती महाराष्ट्र शासनाकडे केली होती. या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी पराग दकाते यांच्याशी संपर्क साधला. या पर्यटकांना मदत करण्याची त्यांना विनंती केली. त्यानंतर काही वेळात मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशीही फोनवरून संवाद साधत त्यांनी राज्यातील पर्यटकांपर्यंत मदत पोहचवण्याची विनंती केली होती.

यानंतर तत्काळ एनडीआरएफची पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात अडकलेल्या पर्यटकांना सुखरूपरित्या सुरक्षित ठिकाणी हलवले. या नंतर या पर्यटकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधत केलेल्या मदतीसाठी आभार मानले. तसेच आपल्याशी फोनवरून बोलल्यानंतर वेगाने चक्र फिरून अवघ्या काही तासात आपली सुटका झाल्याचे सांगत त्यांनी वेळीच मदत पोहचवल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande