भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा दावा जय शंकर यांनी फेटाळाला
वॉशिंगटन , 3 जुलै (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा केली होती. मात्र भारताने दोन्ही देशांच्या सैन्यदलांच्या डीजीएमओंनी युद्धविरामावर सहमती दर्शवल्याचे सांगितले होते. तरीही भारत आणि प
Jay shankr


वॉशिंगटन , 3 जुलै (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा केली होती. मात्र भारताने दोन्ही देशांच्या सैन्यदलांच्या डीजीएमओंनी युद्धविरामावर सहमती दर्शवल्याचे सांगितले होते. तरीही भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी अमेरिकेत गेलेल्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्रम्प यांनी केलेला हा दावा फेटाळून लावला आहे.

जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाची घोषणा केली, तेव्हा तुम्हाला काय वाटलं. त्यावेळी पीएमओमध्ये काय वातावरण होतं. असं विचारलं असता, जयशंकर म्हणाले की, त्यावेळी काय घडलं याच्या नोंदी खूप स्पष्ट आहेत. हा युद्धविराम दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी निश्चित केला होता. त्यामुळे मी हा मुद्दा इथेच संपवतो. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये भारत आणि अमेरिका हेच मध्यवर्ती आहेत. आमचा देश एक मोठा देश आहे. जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आमचा समावेश होतो. आमची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आमचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारतानाही आपल्यामध्ये आत्मविश्वास दिसला पाहिजे, असे जयशंकर यांनी पुढे सांगितले.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धविरामावर १८ जून रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून झालेल्या संभाषणावेळीही जोरदार चर्चा झाली होती, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande