व्हिएन्ना, 3 जुलै (हिं.स.)
दिल्लीहून
वॉशिंग्टनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला.
व्हिएन्नामध्ये इंधन भरण्यासाठी उड्डाण थांबल्यानंतर हा बिघाड आढळून आला. त्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आले. विमान कंपनीने वॉशिंग्टनला जाणाऱ्या
प्रवाशांना व्हिएन्नामध्ये उतरवले आणि त्यांना पर्यायी सुविधेद्वारे प्रवास करायला
सांगितला. त्याचप्रमाणे एअर इंडियाचे वॉशिंग्टन डीसीहून व्हिएन्ना
मार्गे नवी दिल्लीला जाणारे विमान देखील रद्द करण्यात आले.
एअर
इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, २
जुलै रोजी नवी दिल्लीहून वॉशिंग्टन डीसीला जाणारे विमान क्रमांक एआय १०३ व्हिएन्ना
येथे इंधन भरण्यासाठी थांबवण्यात आले होते. इंधन भरताना नियमित तपासणी दरम्यान
विमानात तांत्रिक बिघाड आढळून आला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी अतिरिक्त वेळ
आवश्यक होता. यामुळे व्हिएन्नाहून वॉशिंग्टन डीसीला जाणारे विमान रद्द करण्यात आले
आणि प्रवाशांना खाली उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra