आ.संग्राम जगताप धमकी प्रकरणातील एक आरोपी तेलंगणा राज्यातुन जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई अहिल्यानगर 4 जुलै (हिं.स.) : आ. संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास साहेबराव शिरसाठ यांचे मोबाईलवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून संग्राम को दोन दिन के अंदर खत्म करूंगा असा आलेल्या मॅसेजवरून कोतवाली पोलीस
आ.संग्राम जगताप धमकी प्रकरणातील एक आरोपी तेलंगणा राज्यातुन जेरबंद


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई

अहिल्यानगर 4 जुलै (हिं.स.) : आ. संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास साहेबराव शिरसाठ यांचे मोबाईलवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून संग्राम को दोन दिन के अंदर खत्म करूंगा असा आलेल्या मॅसेजवरून कोतवाली पोलीस स्टेशन अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नं.796/2025 बीएनएस कलम 351 (4) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी तेलंगणा राज्यातुन एका आरोपी ला अटक केली आहे.

याबाबतची माहिती अशी की, 2 जुलै रोजी तक्रारदार सुहास साहेबराव शिरसाठ, रा.बुरूडगाव रोड, अहिल्यानगर यांचे मोबाईलवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून संग्राम को दोन दिन के अंदर खत्म करूंगा असा आलेल्या मॅसेजवरून कोतवाली पोलीस स्टेशन अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नं.796/2025 बीएनएस कलम 351 (4) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कोतवाली पोलीस स्टेशन अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या दोन धमकी प्रकरणांची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना पथक नेमुन गुन्हयाचा तपास करणे बाबत आदेश दिले.त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार फुरकान शेख, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, अमृत आढाव अशांचे पथक नेमुन गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

सदरच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा हा अनिस महंमद हनिफ शेख, रा.चकलंबा, ता.गेवराई, जि.बीड याने केला असल्याचे तपासात निष्पन्न केले.तसेच तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपी हा सध्या तेलंगणा राज्यात असल्याची माहिती प्राप्त झाली.मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे धग्गी, ता.जि.निजामाबाद, तेलंगणा राज्य येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन अनिस महंमद हनिफ शेख, वय 32, मुळ रा.रूस्लाबाद, पो.चकलंबा, ता.गेवराई, जि.बीड हल्ली रा.नारेगाव, ता.जि.छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेतले.

पथकाने ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने नमूद गुन्हा केल्याची माहिती सांगीतली.तसेच दि.02/07/2025 रोजी त्याने स्वत:चे मोबाईलवरून दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर Sangram ko do din ke andar khatm karunga असा टेक्स मॅसेज केल्याची माहिती सांगीतली.ता ब्यातील आरोपीस कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं 612/2025 या गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande