नवी दिल्ली, 6 जुलै (हिं.स.)
ग्रीसमध्ये
झालेल्या ड्रोमिया इंटरनॅशनल स्प्रिंट अँड रिले स्पर्धेमध्ये धावपटू अनिमेश
कुजूरने १०० मीटर शर्यतीत १०.१८ सेकंदांच्या वेळेसह राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
२२ वर्षीय कुजूरने ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये गुरिंदरवीर सिंगचा १०.२० सेकंदांचा
पूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
ग्रीसचा
सोटिरियोस गारागॅनिसने १०.२३ सेकंदांची वेळ नोंदवत आणि सॅम्युएली सॅम्युएल्सन १०.२८
सेकंदांची वेळ नोंदवत वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर सिल्व्हर लेबल स्पर्धेत
अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. कुजूरच्या नावावर आता १०० मीटर आणि २००
मीटर दोन्ही राष्ट्रीय विक्रम आहेत. मे महिन्यात दक्षिण कोरियामध्ये झालेल्या
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या २०० मीटर अंतिम फेरीत त्याने
२०.३२ सेकंद वेळ नोंदवून मागील राष्ट्रीय विक्रम मोडला होता.
आशियाई
खेळांमध्ये रौप्यपदक विजेत्या मोहम्मद अफसलने याआधी स्वतःचा राष्ट्रीय विक्रम
मोडला. पोलंडमधील पोझ्नान येथील मेमोरियल चेस्लावा सायबुलस्किगो येथे पुरुषांच्या
८०० मीटर शर्यतीत १:४५ मिनिटांपेक्षा कमी वेळ पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरला.
अफसलने २०२२ च्या हांग्झो येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
त्याने १:४४.९६ मिनिटे वेळ नोंदवली आणि स्पर्धेच्या हीट ए-१ मध्ये सहावे स्थान पटकावले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra