वॉशिंग्टन डीसी, 6 जुलै (हिं.स.)
अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेतील एक मोठी चूक समोर आली आहे. न्यूजर्सी
येथील राष्ट्राध्यक्षांच्या खाजगी गोल्फ कोर्सवरून एक विमान उडाले. त्यानंतर लगेचच उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडने
अर्थातच एनओआरएडीने घुसखोर विमानाला हाकलून लावण्यासाठी लढाऊ विमाने पाठवली. एनओआरएडीने या घटनेची माहिती दिली आहे. ज्या
वेळी ही घटना घडली, त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी
मेलानिया ट्रम्प स्वातंत्र्य दिनानंतरचा आठवडा साजरा करण्यासाठी गोल्फ कोर्सवर उपस्थित
होते.
एनओआरएडीच्या निवेदनानुसारनागरी विमानाने शनिवारी (५ जुलै) स्थानिक वेळेनुसार दुपारी
२:४० वाजता म्हणजेच रविवार भारतीय वेळेनुसार १२:१० वाजता तात्पुरत्या उड्डाण
प्रतिबंधक क्षेत्रात उड्डाण केले. लढाऊ विमानांनी ते सुरक्षितपणे बाहेर काढले.
निवेदनात असेही नमूद केले आहे की, हे दिवसातील प्रतिबंधित हवाई क्षेत्राचे चौथे
उल्लंघन होते आणि नंतर आणखी एक उल्लंघन झाल्याचे निदर्शानास आले आहे.
घुसखोराला
पळवून लावण्यासाठी कोणत्या लढाऊ विमानाचा वापर करण्यात आला हे उघड केले नसले तरी, ते एफ-१६ लढाऊ विमान असल्याची माहिती आहे.
फेब्रुवारीमध्येही एनओआरएडीने फ्लोरिडामधील ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टवर
हवाई क्षेत्राच्या उल्लंघनाच्या प्रत्युत्तरादरम्यान तीन एफ-१६ विमानांचा वापर
केला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra